भोर तालुक्याला वैद्यकीय साधनांची उपलब्धता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर तालुक्याला वैद्यकीय साधनांची उपलब्धता
भोर तालुक्याला वैद्यकीय साधनांची उपलब्धता

भोर तालुक्याला वैद्यकीय साधनांची उपलब्धता

sakal_logo
By

भोर, ता. १० : तालुक्यातील नागरिकांना उत्तम व वेळेत आरोग्य सेवा मिळावी यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे-लक्ष्मी रोड यांच्यावतीने ८५ लाख रुपयांची वैद्यकीय साधने व भौतिक सुविधा उपलब्ध केले.

यामध्ये तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अत्यावश्यक साहित्याचा समावेश आहे. वैद्यकीय विभागास सोलर वॉटर हिटर, फ्रिज, सेल काउंटर (ब्लड रिपोर्ट दीड तासात देणारे मशिन), शस्त्रक्रिया टेबल्स, प्रसूती टेबल, शस्त्रक्रिये दरम्यान लागणारे विविध साहित्य, श्वसन मार्ग व छेद प्रसूती शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आदी प्रकारची प्रमुख साहित्य आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३० चे माजी प्रांतपाल रोटेरियन मोहन पालेशा यांच्या हस्ते हे साहित्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केले.


यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके, डॉ. अनंत साबणे, डॉ. उदय जोशी, प्रा. विनय कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ पुणे लक्ष्मी रोडचे अध्यक्ष हेमंत शिरगुप्पी, डॉ. प्रदीप पाटील, जोगवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जयदीप कापशीकर, डॉ. मेधा लोंढे आदी उपस्थित होते. याप्रसंगी केतन शहा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रा. विनय कुलकर्णी यांनी आभार मानले.