भोरमधील पोलिस वसाहतीजवळ गांधीलमाश्यांनी बांधले मातीचे घरटे
भोर, ता. १३ : सुगरण पक्षांची झाडावर लोंबणारी घरटी (खोपी) आपण अनेक वेळा पाहतो. परंतु भोर शहरातील पोलिस वसाहतीजवळील झाडावर गांधीलमाश्यांनी बांधलेले मातीचे हे पहिलेवहिले घर हा एक औत्सुक्याचा विषय बनला आहे.
करंजे जातीच्या झाडाच्या छोट्या फांदीवर लटकलेल्या गांधीलमाशीच्या घरट्याचा आकार पाण्याच्या मोठ्या माठाएवढा आहे. मातीने तयार केलेल्या या घरट्याची उंची सुमारे अडीच-तीन फूट तर घेर २ फुटांचा आहे. त्यावर अनेक छिद्रे असून शेकडो गांधीलमाश्या त्यातून येजा करीत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पोलिस ठाण्याला जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला झाडावरच हे गांधीलमाशीचे घर असल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वादळाने किंवा आगीमुळे जर घरटे खाली पडले तर त्यामधील गांधीलमाशा रहिवाशांना आणि येणाऱ्या - जाणाऱ्यांना चावण्याची शक्यता आहे. हे घर गेल्या पावसाळ्यात बांधले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, वन विभागाकडून याबाबतची अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.
01311
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.