भोर शहर चार तासाच चकाचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर शहर चार तासाच चकाचक
भोर शहर चार तासाच चकाचक

भोर शहर चार तासाच चकाचक

sakal_logo
By

भोर, ता. १ः महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (ता.१) सकाळी शहरात महास्वच्छत्ता अभियान राबविण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ दत्तात्रेय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भोरमध्ये महास्वच्छत्ता अभियान राबविण्यात आले.

महास्वच्छता अभियानात प्रतिष्ठानच्या भोर व वेल्हे तालुक्यातील सुमारे ८५० स्वच्छतादूतांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी व इतर विभागांचे ५६ कर्मचारीदेखील होते. शहरातील चौपाटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भोरचे तहसीलदार सचिन पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगराध्यक्षा निर्मला आवारे यांच्या हस्ते या महास्वच्छता अभियानास सुरुवात झाली.
यावेळी नगरसेवक, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील चौपाटी, शिवाजी रोड, नगरपालीका चौक, मंगळवार पेठ, श्रीपतीनगर, एस टी स्टँड, एस टी डेपो, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, वनविभाग कार्यालय, बाजारपेठ, स्मशानभूमी आणि शहराच्या आसपासचा सर्व परिसर स्वच्छ केला. शहरातील सार्वजनिक व मोकळ्या जागेत साठलेला राडारोडाही स्वयंसेवकांनी साफ केला. नगरपालिकेच्या वतीने ४ ट्रॅक्टर, ७ घंटागाड्या आणि ४ टेंपोच्या सहाय्याने सर्व कचरा कचराडेपोत वाहून नेला. केवळ चार तासात कचऱ्याच्या वाहनांच्या एकून ४७ फेऱ्या करण्यात आल्या.


01388