पिसावरे येथील माळरानावर वृक्षारोपण

पिसावरे येथील माळरानावर वृक्षारोपण

भोर, ता. ६ : पिसावरे (ता.भोर) येथील माळरान तसेच शाळेच्या परिसरात जागतिक पर्यावरण दिनी सोमवारी (ता. ५) वृक्षारोपण करण्यात आले. भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे माध्यमिक विद्यालयाने व फ्रेंड्स सोशल फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचे नियोजन केले होते.

पिसावरे माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरात व माळरानावर वड, पिंपळ, बदाम अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खड्डे घेऊन त्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने रोपांची लागवड केली. लागवड केलेल्या रोपांची निगा राखण्याचे नियोजनही फ्रेंड्स सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका शशिकला कोंढाळकर, शिक्षक धनंजय कोठावळे, संतोष दळवी यांच्यासह निशा धावले, प्रीतम अडसूळ, सिद्धेश धावले, अनिकेत साप्ते, सूरज अडसूळ, यशवंत चौधरी, संकेत बरदाडे, रोहित बरदाडे, नारायण धुमाळ यांनी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.

दरम्यान, शिक्षकांनी सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी याबद्दल माहिती दिली. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ''बीट प्लास्टिक'' अशी असून केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर पालकांनी आणि ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणासाठी कार्यक्षम राहावे असे आवाहन यावेळी शिक्षकांनी केले.


01765

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com