चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रार्थना

चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रार्थना

भोर, ता. २१: येथील योग विद्याधाम भोर शाखेच्या वतीने येथील भोरेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ओंकार जप, रुद्राभिषेक आणि महामृत्यूंजय मंत्र, अभिषेक करण्यात आला. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना भाविकांकडून प्रार्थना करण्यात आली. सर्वांचे जीवन तणावमुक्त व्हावे यासाठी शंभूमहादेवाला साकडे घालण्यात आले

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी भोरेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर शंकराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, योग विद्याधामचे केंद्रप्रमुख नंदकुमार देवी, प्रवीण पानसरे, रवींद्र जोशी व अनुराधा देवी यांच्या मार्गदर्शनाखाली ४० योगसाधक या उपक्रमात सहभागी झाले. योगसाधकांनी मंदिराच्या कासव गाभाऱ्यात बसून १०१ ओंकार जप आणि महामृतयूंजय मंत्र अभिषेक करण्यात आला. यामध्ये १५ महिलांचाही समावेश होता. भोरेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सोमवारी (ता.२१) पहाटे सहा वाजता शंभूमहादेवाला अभिषेक करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार देवी आदींसह ज्ञानेश्वर मचाले, विनायक सणस, गोपीनाथ आगाशे व श्रध्दा भातलवंडे आदी विश्वस्त उपस्थित होते. भोरेश्वर मंदिर दुपारी १ ते ३ या वेळेमध्ये बंद राहणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

02125

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com