शिरवलीतील तरुणावर
अत्याचारप्रकरणी अटक

शिरवलीतील तरुणावर अत्याचारप्रकरणी अटक

भोर, ता. २१ : अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी शिरवली (ता. भोर) येथील तरुणास भोर पोलिसांनी सोमवारी (ता. २१) सायंकाळी अटक केली. वैभव पांडुरंग गिरे (वय २५) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने गेल्या दहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत. अत्याचारित मुलगी ही पुण्यात राहत असून, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ती शिरवली येथे आली होती. तेव्हापासून वैभव याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. पोटात दुखत असल्यामुळे मुलगी दवाखान्यात गेली असता ती गरोदर असल्याचे लक्षात आले. त्यामुळे गुरुवारी (ता. १७) पुण्यातील भारती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी हा गुन्हा भोर पोलिसांकडे वर्ग केला. त्यानुसार पोलिसांनी वैभव यास सोमवारी सायंकाळी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे या पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com