नांदगावमधील दोन खडी मशीन
तात्पुरते बंद करण्याचे आदेश

नांदगावमधील दोन खडी मशीन तात्पुरते बंद करण्याचे आदेश

भोर, ता. ६ : भोर- महाड मार्गावरील नांदगाव (ता. भोर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या दोन खडी मशिन तात्पुरत्या बंद करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले.
खडी क्रशरच्या सुरुंगाच्या हादऱ्याने बुधवारी (ता. ३) नांदगावमधील शेतकरी विष्णू कुडले यांच्या घराची भिंत पडली. त्यामुळे त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकारानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत क्रशर बंद करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत तहसीलदार सचिन पाटील यांनी मंडलाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचा अहवाल येईपर्यंत नांदगावच्या हद्दीत असलेल्या दोन्ही क्रशर बंद करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या क्रशरचा अनेक वर्षांपासून संपूर्ण गावाला त्रास होत आहे. गावातील घरांच्या भिंतींना या क्रशरच्या सुरुंगाच्या हादऱ्याने तडे गेले आहेत. याशिवाय या क्रशरमुळे शेती उत्पादनावर परिणाम होत असून, जमीन नापीक होत आहे. ग्रामस्थ व पाळीव जनावरे यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. याबाबत अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन याची दखल घेत नसल्याने ग्रामस्थ रोष व्यक्त करीत आहेत. अशा घटनांमुळे जीवित हानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com