‘रोटरी क्लब’मुळे उजाळणार २५ वर्षे मोफत घरकुल

‘रोटरी क्लब’मुळे उजाळणार २५ वर्षे मोफत घरकुल

भोर, ता. २४ : पुण्यातील रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाईड आणि रोटरी क्लब ऑफ पुणे युवा यांच्या वतीने राबविलेल्या पर्यावरणपूरक सोलर प्रकल्पामुळे हातवे बुद्रुक (ता.भोर) येथील ५० कुटुंबांना पुढील २५ वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे. त्यांना दरमहा झिरो वीजबिल येणार आहे. यामुळे एका कुटुंबाचे तब्बल १ लाख ८० हजार ००० रुपये वाचणार आहेत.

हातवे येथे रोटरीच्या सदस्या डॉ. मिनाक्षी बोराटे यांच्या पुढाकाराने शनिवारी (ता.२०) या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. ‘इमर्सन’चे उपाध्यक्ष अजय सावरगावकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करून प्रकल्प संबंधित ग्रामस्थांकडे हस्तांतरित करण्यात आला. रोटरी ब्लबच्या वतीने अमेरिकेत मुख्य कार्यालय असलेल्या इमर्सन कंपनीने या प्रकल्पाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. लाभार्थी शेतकऱ्याला सध्या येत असलेले ६०० ते ७०० रुपयांचे वीजेचे बिल हे झिरो येणार आहे.


यावेळी रोटरीच्या माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. माधव बोराटे, शीतल शहा, रोटरी क्लब ऑफ पुणे युवाचे अध्यक्ष निनाद जोग, सेक्रेटरी अर्चिता मडके, धनश्री जोग, रोटरी क्लब ऑफ पुणे हिलासाईटचे अध्यक्ष अजय पवार, अदिती रहाणे, महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रसाद कुलकर्णी, रवी इलेक्ट्रीकल्स अॅड इलेक्ट्रॉनिक्स चे तुलसीदास वाबळे, अमर वाबळे, अभय बनसोड, अॅड. मुर्तझा जीवानजी, विकास जाधव आदींसह रोटरी क्लबचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

३०,००००० प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजित
५०,००० ते ५२००० एका सोलरची किंमत
५० कुटुंबांची प्रकल्पासाठी निवड
१,८०,००० रुपये.... एका कुटुंबाची होणार बचत

दृष्टिक्षेपात
- सोलरमधून निर्माण झालेली वीज नेट मीटरद्वारे महावितरणला
- विशेष मीटरमार्फत वीज संबंधित लाभार्थ्यांच्या घरात
- तयार आणि वापरलेल्या विजेच्या आकडेवारी होणार नोंदणी
- दररोज एक केव्हीए एवढ्या विजेची निर्मिती
- रोटरीतर्फे सोलर प्रकल्पाची देखभालही होणार

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी रोटरी क्लबने हा नवीन प्रकल्प सुरु केला आहे. महावितरणच्या परवानगीने आणि इमर्सन कंपनीच्या साहाय्याने आम्ही हा प्रकल्प यशस्वी केला आहे. हातवे ब्रु मधील ५० कुटुंबांचा वीजेचा प्रश्न सोडविल्याचा आम्हाला आनंद आह
- डॉ. मिनाक्षी बोराटे, संकल्प पर्यावरणपूरक सोलर प्रोजेक्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे युवा

03455, 03472, 03473

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com