भोरमध्ये अंबाबाई देवीच्या पालखीची वाद्यांच्या गजरात मिरवणूक

भोरमध्ये अंबाबाई देवीच्या पालखीची वाद्यांच्या गजरात मिरवणूक

भोर, ता. २४ : चैत्र पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (ता. २३) शहरातील वेताळ पेठेतील अंबाबाई देवस्थानच्या वतीने अंबाबाई देवीच्या काठी-पालखीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. नगरपालिकेशेजारील अंबामातेच्या मंदिरापासून काठी-पालखीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. वेताळपेठ, शिवतीर्थ चौपाटी, शिवाजी पुतळा मार्ग, नगरपालिका चौक या मार्गाने पुन्हा अंबामातेच्या मंदिरात मिरवणुकीचा शेवट झाला. दिवसभरात मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये देवीचा अभिषेक, होमहवन, जागरण गोधळ, काठीपूजन, पालखी पूजन, परडी भरणे कार्यक्रम, सुवासिनी जेवण, देवीचा छबिना, प्रवचन, भजन व कीर्तन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. बुधवारी (ता. २४) सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे, उपाध्यक्ष पांडुरंग साळुंके, सचिव नीलेश साळुंके व खजिनदार प्रमोद पाटणे आदींसह संचालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com