माळरानावर खेळतात भोरचे खेळाडू

माळरानावर खेळतात भोरचे खेळाडू

विजय जाधव : सकाळ वृत्तसेवा
भोर, ता. १० : शहरात आजपर्यंत एकही क्रिडा संकुल, कुस्ती संकुल आणि खेळाचे मैदान नसल्यामुळे नवोदित खेळाडूंसमोर सराव कुठे करायचा हा प्रश्न पडला आहे. भोर नगरपालिका ही संस्थानकाळातील असूनही खेडाळूंसाठी हव्या त्या सुविधा झाल्या नसल्यामुळे मोठ्या दर्जाचे खेळाडू तयार झाले नाहीत. मैदान नसल्यामुळे पालकांना मुला-मुलींना शाळा-महाविद्यालयांच्या मैदानाचा किंवा मोकळ्या माळरानांचा वापर करावा लागत आहे.

मैदानावर किंवा माळरानावर कोणत्याही सुविधा किंवा प्रशिक्षक नाहीत. त्यामुळे खेळाडूंचे भविष्य अंधारातच राहिले आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील कुस्ती हा पारंपरिक खेळ असूनही भोरमध्ये एकही कुस्ती संकुल नाही. शहरातील वेताळ पेठेतील जुनी तालीम आणि एक खासगी कुस्ती संकुल आहे. मात्र त्या ठिकाणी अनेक मर्यादा येत आहेत. नगरपालिकेच्या किंवा शासनाकडून कोणतेही कुस्ती संकुल झाले नाही. त्यामुळे पहिलवानांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रचारात हा मुद्दा घेतला नाही.

जागा आरक्षित, कार्यवाही नाही
नगरपालिकेच्या २०१७ साली झालेल्या विकास आराखड्यात एका ठिकाणी क्रीडा संकुल आणि चार ठिकाणी खेळाच्या मैदानासाठी जागा आरक्षित केली आहे. मात्र यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. क्रीडा संकुलासाठी अडीच हेक्टर आणि खेळाच्या मैदानासाठी साडेसहा हेक्टर जागा आरक्षित केली आहे. त्यापैकी वेताळ पेठेतील सर्व्हे नंबर ५११ मधील सुमार २ एकर जागेवर खेळाचे मैदान तयार करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रीया सुरु झाली असून पुढील आठ ते १० महिन्यात हे मैदान वापरासाठी तयार होणार आहे. इतर चार ठिकाणच्या आरक्षणाबात नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही.


क्रीडा संकुल व मैदानासाठी ठेवलेले आरक्षण पुढीलप्रमाणे.
अनुक्रमांक आरक्षण क्रमांक सर्व्हे नंबर क्षेत्र ठिकाण
१ ३५ २६३ २.४७ हेक्टर मांढरदेवी रोड
२ ३७ १८०,७०,७१ २.१४ हेक्टर मांढरदेवी रोड
३ ४५ ११ २.५ हेक्टर एसटी डेपोच्या मागे
४ १४ ४५ ०.८५ हेक्टर वेताळ पेठ
५ १८ २४२ १.१४ हेक्टर पिराचा मळा.


नगरपालिकच्यावतीने वेताळ पेठेतील सर्व्हे नंबर ५११ मधील १.१४ हेक्टर (सुमारे अडीच एकर) जागेवर खेळाचे मैदान सुरु करण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाने प्रक्रीया सुरु केली असून संबंधित शेतकऱ्यांना जागेचा मोबदला दिला आहे. जागा ताब्यात घेऊन पुढील आठ-दहा महिन्यात त्या ठिकाणच्या खेळाचे मैदान तयार करून खेळाडूंना खेळण्यासाठी खुले होणार आहे''.
- श्रीराम पवार, मुख्याधिकारी, भोर नगरपालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com