भोरमधील मारामारीप्रकरणी
११ आरोपांनी सशर्त जामीन

भोरमधील मारामारीप्रकरणी ११ आरोपांनी सशर्त जामीन

भोर, ता. १० : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (ता. ६) मतदारांना पैसे वाटण्याच्या कारणावरून दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली होती. त्याबाबत भोर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी शुक्रवारी (ता. १०) सकाळी कारवाई करीत दोन्ही गुन्ह्यातील ११ आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांची सशर्त जामीनावर मुक्तता केली. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील एक महिन्यात सर्व आरोपींना दररोज पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.
याबाबत पहिली फिर्याद कुणाल धुमाळ यांनी मंगळवारी (ता. ७) पहाटे दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गणेश ज्ञानोबा पवार, सचिन तुकाराम चुनाडी, मंगेश संतोष ओतारी, समीर सुरेश शेटे आणि बालाजी शेटे (सर्वजण रा. भोर) यांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मंगेश ओतारी याने बुधवारी (ता. ८) भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अतुल अरुण काकडे, कुणाल धुमाळ, सुहीत जाधव, विनायक देशपांडे, केदार देशपांडे आणि विशाल तुंगतकर यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. याबाबत भोरचे पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, मारहाणीच्या दोन दिवसानंतर दुसरा गुन्हा दाखल केल्यामुळे विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भोर पोलिस ठाण्यात पुणे ग्रामीण मुख्यालयाने भोरमध्ये १०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही भोरला भेट दिल्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com