कामात तत्परता असलेले बापू चोबे

कामात तत्परता असलेले बापू चोबे

कामात तत्पर असलेले बापू चोबे

प्रत्येक कामात तत्परता दाखविणारे भोर नगरपालिकेतील कार्यालयीन अधीक्षक बापू अन्नपूर्णा मधुकर चोबे. हे नोकरी नव्हे तर लोकसेवक म्हणून कामकाज करीत आहेत. आपल्या कामाच्या चार वर्षांच्या कालावधीत व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर नगरपालिकेच्या कर विभागातून स्वच्छ सर्वेक्षण विभाग ते कार्यालयीन अधीक्षक पदावर काम करीत आहेत. कामात राम असतो, याची जाणीव ठेवून ते आपली सर्व कामे आनंदाने करीत आहेत. नियमांनुसार आणि कायद्याच्या चौकटीत कामे करून माणुसकी जपत ते आपले कामकाज करीत आहेत.
-बापू चोबे, कार्यालयीन अधीक्षक, भोर नगरपालिका

मूळचे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सिरसाव येथील असलेले बापू चोबे यांना शासकीय कामाचे बाळकडू घरातूनच मिळाले. घरातील एकत्र कुटुंब पद्धतीत राहिल्यामुळे उपजिल्हाधिकारी पदी कार्यरत असलेले काका रामचंद्र चोबे यांच्याकडून त्यांना शासकीय सेवेत दाखल होण्याची ऊर्जा मिळाली. आई-वडील शेती करीत असल्यामुळे त्यांनी काकांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल सुरू केली. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी (बी. ई) घेतली. काकांच्या मार्गदर्शनाखाली एमपीएसीचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर परीक्षा देवून ते २०१९ मध्ये भोर नगरपालिकेच्या कर विभागात सहायक कर निरीक्षक म्हणून जॉईन झाले.

कामाच्या जोरावर अधीक्षकापदाची जबाबदारी
शासकीय कागदपत्रांची योग्य पद्धतीने मांडणी, कामाची हाताळणी आणि नगरपालिकेच्या हिताबरोबर नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य याबाबत त्यांनी काम करायला सुरुवात केली. कर विभागात काम करीत असताना त्यांनी नागरिकांना नवीन तांत्रिक कार्यपद्धतीची माहिती देवून करांबाबतच्या तक्रारी कमी करण्याचे काम केले. आपणाला नगरपरिषदेकडून सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर करभरणा किती महत्त्वाचा आहे. हे त्यांनी नागरिकांना पटवून दिले. त्यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांना स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे काम देण्यात आले. त्यामध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविल्यामुळे त्यांची कार्यालयीन अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. तरुण आणि कामात व्यस्त असल्यामुळे ते अधिकारी व पदाधिकारी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले. शासकीय नियमांची माहिती असल्यामुळे त्यांच्या कामात त्यांचा हातखंडा असल्याची ओळख निर्माण झाली. त्यामुळेच त्यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली.

वंचितांना लाभ देण्याचे उद्दिष्ट
चोबे यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला आहे. आपल्या हातून सर्वसामान्य जनतेची सेवा घडावी हाच विचार मनात ठेवून कामकाज करीत आहेत. भविष्यात शासकीय सेवेत राहून गरजू, वंचित व सर्वसामान्य लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम करणार असल्याचे ते अभिमानाने सांगत आहेत. स्पर्धा परीक्षेत यश मिळविल्यामुळे सिरसाव ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला. त्यावेळी बापू चोबे यांचे चुलते उपजिल्हाधिकारी रामचंद्र चोबे, वडील मधुकर चोबे, आई अन्नपूर्णा चोबे, भाऊ मोहन चोबे व बहीण शीतल बोबडे उपस्थित होते. त्याचबरोबर मुलाच्या हस्ते आई-वडिलांचा सत्कार करून आशीर्वाद घेऊन त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या विचारावर त्यांची श्रध्दा असून त्यांचे उपजिल्हाधिकारी असलेले काका रामचंद्र चोबे यांच्याकडून ते नेहमी कायद्याच्या नवनवीन नियमांची माहिती करून घेत आहेत. आजपर्यंत त्यांनी मुख्याधिकारी संतोष वारुळे, विजयकुमार थोरात, हेमंत किरुळकर यांच्यासमवेत काम केल्यानंतर विद्यमान मुख्याधिकारी श्रीराम पवार या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करीत आहेत. नगरपालिकेत तक्रार करण्यासाठी आलेल्या किंवा अडचणीत असलेल्या रहिवाशांना ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत आहेत. बापू चोबे यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावो हीच सदिच्छा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com