महसूल खात्यातही जपले समाजकार्याचे व्रत

महसूल खात्यातही जपले समाजकार्याचे व्रत

महसूल खात्यातही जपले समाजकार्याचे व्रत

महसूल खात्यात नोकरी करून समाजकार्यात अग्रेसर राहून गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे व्रत तलाठी महेश रामदास माने हे घेतले आहे. यामुळे ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे सेवक ठरले आहेत. नगर जिल्ह्यातील मिरजगाव (ता. कर्जत) येथील मूळगाव असलेले माने हे भोर तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे खेड शिवापूरसह राष्ट्रीय महामार्गालगतची वर्वे बुदुक, वर्वे खुर्द, केळवडे, साळवडे आदी गावांचा कार्यभार आहे.
- महेश माने, तलाठी


शेतकरी कुटुंबात जन्मलेले महेश माने यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिरजगाव येथे पूर्ण झाले. त्यांनी पुण्यातील एका संस्थेमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. राज्य शासनाच्या महसूल विभागात २०१६ मध्ये तलाठी म्हणून रुजू झाले. त्यांनी वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील अतिदुर्गम भागात सलग आठ वर्षे काम करून नावलौकीक मिळवला आहे.

‘श्रीराम बहुउद्देशीय’द्वारे कोरोना काळात गरजूंना मदत
नोकरीमध्ये शेतकरी व आर्थिक बाजूने सक्षम नसलेल्या कुटुंबांची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी गावाकडे श्रीराम बहुउद्देशीय प्रतिष्ठान सुरू करून त्यामार्फत समाजकार्य कार्याचा प्रारंभ केले. कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात त्यांनी स्वखर्चाने वेल्हे तालुक्यातील कादवे येथील अनेक आदिवासी व कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यामुळे वेल्ह्याचे तत्कालीन तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्यासह पोलिस निरीक्षक आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदनही केले. माने यांनी त्यांच्या श्रीराम बहुउद्देशीय प्रतिष्ठानमार्फत गावाकडील मिरजगाव पंचायत समितीच्या गणात गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे कीट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. याशिवाय मित्रांच्या सहकार्याने त्यांनी मिरजगावातच ऑक्सिजन सुविधेसह कोविड सेंटर उभारून त्यामार्फत कोविड रुग्णांवर उपचार केले.

गरजू नागरिकांना अन्नधान्याचे मोफत वाटप
महेश माने यांनी लहूजी कापरे युवा मंच आणि ग्रामपंचायतच्या मदतीने शिवार रस्त्याची दुरुस्ती करून त्यावर मुरूम टाकण्याचेही काम केले. यामुळे नागरिकांचा काही प्रमाणात दळणवळणाचा प्रश्न मिटला. कोरोना कालावधीत मिरजगावच्या प्रभाग क्रमांक ५ मधील गरजू नागरिकांना अन्नधान्याचे मोफत वाटप केले आणि ५०० कुटुंबांना होमिओपॅथिक औषधांचेही वाटप केले.


अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदत
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांनाही त्यांनी औषधे व इतर साहित्य पुरवून मदत केलेली आहे. पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील १२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी महेश माने यांनी घेतलेली आहे. हे विधायक कार्य आजतागायत त्यांचे हे काम सुरू आहे.


शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन
महेश माने यांच्या सामाजिक कार्याचे अधिकारी व जनसामान्यांतून कौतुक होत आहे. कारण समाजकार्य करताना ते आपले नोकरीचे कर्तव्यात कसूर करीत नाहीत. शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे आणि त्यांना कागदपत्रांची माहिती वेळेवर देत आहेत. त्यामुळे अधिकारी, काम करीत असलेल्या ठिकाणचे नागरिक आणि त्यांच्या गावाकडील ग्रामस्थांमध्ये ते नेहमीच चर्चेत असतात. याच कारणामुळे त्यांना आजपर्यंत महसूल विभागाच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत.

महाराष्ट्राच्या सेवकास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसीलदार सचिन पाटील हे महेश माने यांच्या कामावर समाधान व्यक्त करीत आहेत. महेश माने यांना त्याच्या कार्यात कुटुंबासह मित्र नेहमीच मदत करीत आहेत. अशा समाजकार्यात सहभागी असलेल्या महाराष्ट्राच्या सेवकास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.


03586, 03585

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com