भोर तालुका खरेदी-विक्री संघातर्फे अल्पदरात खते, बियाणे उपलब्ध

भोर तालुका खरेदी-विक्री संघातर्फे अल्पदरात खते, बियाणे उपलब्ध

भोर, ता. १० : भोर तालुका खरेदी-विक्री संघामार्फत अल्पदरात खते आणि बियाणांची अल्पदरात विक्री सुरू करण्यात येत आहे. बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाकडून खात्रीशीर खते व बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे यांनी केले. यामध्ये युरिया, १०.२०.२०, १३.२०.२०, २०.१०.१० आणि डीएपी या प्रमुख खतांचा समावेश आहे. याशिवाय सोयाबीनचे बियाणेदेखील उपलब्ध आहे. महाबीज कंपनीच्या इंद्रायणी जातीच्या भाताच्या बियाणांची कमतरता असल्यामुळे यावर्षी केवळ आठ टन बियाणांची विक्री झाली. याशिवाय पुढील पंधरावड्यात युरिया ब्रिकेटही उपलब्ध होणार आहे. खताच्या प्रत्येक पिशवीमागे शेतकयांचे बाजारभावापेक्षा १० ते ३० रुपये वाचले जात आहेत. त्यामुळे संघाच्या विक्री ठिकाणांवर शेतकऱ्यांची खते व बियाणे खरेदीसाठी गर्दी होत आहे.
संघाने गतवर्षी खते व बियाणांच्या विक्रीतून तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, शेतकऱ्यांचेही हजारो रुपये वाचविले आहेत. यावर्षी देखील भोर तालुका खरेदी-विक्री संघाकडूनच खते व बियाणे खरेदी करावेत आणि पैशांची बचत करावी, असे आवाहन संघाकडून करण्यात आले. संघाचे उपाध्यक्ष अतुल शेडगे, संचालक विजय शिरवले, नरेश चव्हाण, किशोर बांदल, संपत दरेकर आदींसह सर्व संचालक शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदीसाठी सहकार्य करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com