‘सामाजिक’ प्रतिष्ठानतर्फे
बांदल कुटुंबीयांना मदत

‘सामाजिक’ प्रतिष्ठानतर्फे बांदल कुटुंबीयांना मदत

Published on

भोर, ता. ६ ः भाटघर धरण खोऱ्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या कुंड गावातील कर्त्या पुरुषाने निधन झाले. निराधार कुटुंबाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने आर्थिक मदतीबरोबर साहित्य दिले. भोरचे माजी उपसभापती मानसिंग धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी अतिदुर्गम भागात असलेल्या गावातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सुरू केले आहे. कुंड (ता.भोर) गावातील सुनील विठ्ठल बांदल यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाला उत्पन्नाचे साधन राहिले नाही. पत्नी आणि दोन मुलांना जगणे अवघड झाले. त्यामुळे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वखुशीने वर्गणी जमा केली. आणि जीवनावश्यक साहित्यासह ५३ हजार ५०० रुपये धुमाळ कुटुंबाकडे सुपूर्त केले. मानसिंग धुमाळ यांच्या हस्ते सुनील धुमाळ यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडे ही रक्कम दिली. यावेळी माजी सरपंच अरुण राजिवडे, जननी माता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शरद बांदल, उपसरपंच सुरेश बांदल, ग्रामपंचायत सदस्य तुषार बांदल, भगवान बांदल, मारुती डेरे व दत्ता पोळ आदींसह सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. गेल्या वर्षभरात प्रतिष्ठानकडून तालुक्यातील दुर्गम भागातील कुटुंबांना आर्थिक, वैद्यकीय व शैक्षणिक प्रकारची मदत करण्यात आली आहे. बांदल कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मानसिंग धुमाळ यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.