भोर तालुक्यात एक गट, दोन गणांची वाढ

भोर तालुक्यात एक गट, दोन गणांची वाढ

Published on

भोर, ता. १७ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी नवीन प्रभाग रचनेनुसार तालुक्यात पंचायत समितीचे आठ गण आणि जिल्हा परिषदेचे चार गट तयार झाले आहेत. गतवेळेपेक्षा यावेळी एक गट आणि दोन गणांची वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली असून सोमवारी (ता. २१) पर्यंत नागरिकांकडून हरकती मागवल्या आहेत.
जिल्हा परिषदेसाठी गट क्रमांक ५६ वेळू-नसरापूर, ५७ भोंगवली-संगमनेर, ५८ भोलावडे-शिंद आणि ५९ उत्रौली-कारी हे चार आहेत. पंचायत समितीच्या शिंद गणात सर्वाधिक ४० गावे, तर वेळू गणात सर्वांत कमी १२ गावांचा समावेश आहे.

पंचायत समिती गणनिहाय गावांची नावे पुढीलप्रमाणे
११ वेळू गण (१२ गावे) : शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू, कासुर्डी खेबा, रांजे, कुसगाव, खोपी, शिवरे, वर्वे खुर्द, वर्वे बुद्रूक, कांबरे खेबा, कांजळे.
११२ नसरापूर गण (२१ गावे) : करंदी खेबा, देगाव, नायगाव, केळवडे, साळवडे, कुरुंगवडी, पारवडी, सोनवडी, सांगवी ब्रुद्रूक, कोळवडी, जांभळी, विरवाडी, केतकावणे निम्मे, दिडघर, कामथडी, खडकी, उंबरे, सांगवी खुर्द, निदान, माळेगाव, नसरापूर.
११३ भोंगवली (१८ गावे) : निगडे, धांगवडी, किकवी, मोरवाडी, वागजवाडी, भोंगवली, पेंजळवाडी, टापरेवाडी, गुणंद, वाठार हिंगे, न्हावी ३१५, न्हावी ३२२, भांबवडे, राजापूर, पांडे, सावरदरे, सारोळे, केंजळ.
११४ संगमनेर (२४ गावे) : तांभाड, हातवे खुर्द, हातवे ब्रुद्रूक, भिलारेवाडी, मोहरी ब्रुद्रूक, हरिश्चंद्री, दिवळे, कापूरव्होळ, मोहरी खुर्द, तेलवडी, कासुर्डी गुमा, आळंदे, आळंदेवाडी-भैरवनाथनगर, इंगवली, संगमनेर, हर्णस, लव्हेरी, ब्राम्हणघर वेखो, नऱ्हे, माजगाव, जोगवडी, गोरड म्हसवली, तळे म्हसवली, वाकांबे.
११५ भोलावडे (३६ गावे) : वाढाणे, करंदी ब्रुद्रूक, करंदी खुर्द, कांबरे खुर्द, कांबरे बुद्रूक, कुरुंजी, मळे, गुहिणी, खुलशी, कुंबळे, बोपे, चांदवणे, भूतोंडे, डेरे, भाड्रवली, साळुंगण, सांगवी वेखो, डेहेण, कोंडगाव, पांगारी, नानावळे, जयतपाड, नांदघूर, वेळवंड, राजघर, पसुरे, तळजाईनगर, म्हाळवडी, कर्नवडी, बारे ब्रुद्रूक, बारे खुर्द, किवत, बसरापूर, भोलावडे, सांगवी हिमा, येवली.
११६ शिंद (४० गावे) : गवडी, शिंद, नांद, महुडे खुर्द, ब्राम्हणघर हिमा, महुडे ब्रुद्रूक, भानुसदरा, पिसावरे, वाठार हिमा, नांदगाव, आपटी, करंजगाव, निगुडघर, देवघर, म्हसर खुर्द, म्हसर ब्रुद्रूक, कोंढरी, वेणुपुरी, हिर्डोशी, धामुनशी, वारवंड, कारुंगण, कुंड, शिळींब, राजिवडी, आशिंपी, उंबार्डे, शिरगाव, दुर्गाडी, अभेपुरी, शिरवली हिमा, कुडली खुर्द, कुडली बुद्रूक, गुढे, निवंगण, प-हर खुर्द, माझेरी, प्रहर ब्रुद्रूक, धानिवली, दापकेघर.
११७ उत्रौली (२१ गावे) : शिरवली तर्फे भोर, पोंबर्डी, वेनवडी, भाबवडी, हातनोशी, बाजारवाडी, धावडी, पळसोशी, पाले, वरोडी ब्रुद्रूक, वरोडी डायमुख, वरोडी खुर्द, आंबाडे, कोळवाडी, बालवडी, नेरे, निळकंठ, गोकवडी, खानापूर, उत्रौली, वडगाव डाळ.
११८ कारी (२७ गावे) : रायरी, भांबटमाळ, साळव, भावेखल, अंगसुळे, सांगवी तर्फे भोर, कारी, कोर्ले, टिटेघर, वडतुंबी, शिवनगरी, म्हाकोशी, चिखलगाव, आडाची वा़डी, धोंडेवाडी, रावडी, कर्नावड, कु़डपणेवाडी, वावेघर, आंबवडे, नाझरे, पान्हवळ, चिखलावडे ब्रुद्रुक, चिखलावडे खुर्द, आंबेघर, नाटंबी, करंजे.


भोर पंचायत समिती फोटो
kik17p1-bhor-ps

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com