भोर आगारात एसटीच्या
नवीन पाच बस दाखल

भोर आगारात एसटीच्या नवीन पाच बस दाखल

Published on

भोर, ता. १२ : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात एसटीच्या पाच नवीन बस (लालपरी) शनिवारी (ता. ६) दाखल झाल्या. आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण केले.
एसटीच्या भोर आगारातील जुन्या बस या कालबाह्य व वाहतुकीस सुस्थितीत राहिल्या नसल्यामुळे आम्ही प्रयत्न करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या बस आणल्याचे आमदार मांडेकर यांनी सांगितले. यावेळी आगार व्यवस्थापक रमेश मंता, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, यशवंत डाळ, विद्या पांगारे, निलम झांजले, गणेश निगडे, नितीन थोपटे, विलास वरे, सुनील भेलके, प्रवीण जगदाळे, बाबू शेटे, सोमनाथ ढवळे, विशाल कोंडे, केदार देशपांडे, प्रकाश तनपुरे, संदीप खाटपे आदी उपस्थित होते.
यापूर्वी जून महिन्यात पाच नवीन बस भोर आगाराला देण्यात आल्या आहेत. नवीन बस या सेमीडीलक्स असून, त्यामध्ये पूशबॅक व आरामदायी सीटस्, इंजिनचा आवाज कमी येणाऱ्या आणि पाणी व हवा आतमध्ये न येणाऱ्या आहेत. नवीन बसपैकी तीन बस या आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या भोर- पुणे मार्गावर धावणार असून, उर्वरित दोन बस या लांब पल्ल्याच्या ठिकाणी वापरणार असल्याचे आगार व्यवस्थापक मंता यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com