भोरमधील ७८८ निरक्षर होणार साक्षर

भोरमधील ७८८ निरक्षर होणार साक्षर

Published on

भोर, ता. १६ : भारत सरकारच्या नवभारत साक्षरता कार्यक्रम (एनआयएलपी) उपक्रमाअंतर्गत यावर्षी भोर शहर आणि तालुक्यातील ७८८ निरक्षर व्यक्ती साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी सांगितले. सरकारचा हा उपक्रम २०२३ पासून सुरू झाला असून २०२७ पर्यंत राबविला जाणार आहे.
भोर विकास गटामध्ये २०२३ मध्ये ११८ व्यक्तींना तर २०२४ मध्ये ७९० जणांना साक्षर करण्यात आलेले आहे. याची परीक्षा घेतल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांना प्रमाणपत्रेही दिली आहेत. नवसाक्षरांच्या संभाव्य परीक्षा रविवारी (ता. २१) घेण्याचे नियोजन केले आहे. या गटामधील यु-डायस प्राप्त प्रत्येक शाळेमध्ये स्वयंसेवकांची नोंदणी, लॉगिन टॅगिंग करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३२१ नवसाक्षरांची नोंदणी झाली आहे. यासाठी मागील आठवड्यातच तालुकास्तरावर ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले. प्रत्येक केंद्रामधून एक केंद्रप्रमुख, दोन मुख्याध्यापक व एक तंत्रस्नेही शिक्षक असे प्रति केंद्र चारप्रमाणे आजपर्यंत २०० लोकांनी कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला आहे.
शहरातही नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये कार्यशाळा पार पडली. पुढील आठवड्यामध्ये दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेमध्ये सुनील गोरड यांनी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. तानाजी तारू, दीपक खिलारे व लता वाघोले हे तज्ञ मार्गदर्शक तर श्रीधर गव्हाणे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून काम करीत आहेत. बामणे यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांमार्फत निरक्षर व्यक्तींना परिक्षेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com