सांगवी भिडे येथे आढळला ‘ॲटलस मॉथ’
भोर, ता. २५ : सांगवी भिडे (ता.भोर) येथील सुशांत दत्तात्रेय झुणगारे यांच्या घराच्या परिसरात रविवारी (ता.२०) जगातील सर्वात मोठा दुर्मीळ ॲटलस मॉथ पतंग आढळून आला आहे. त्यास मराठीत श्रीलंकी ॲटलस पतंग असेही म्हणतात. तो आशिया खंडातील जंगलात आढळतो.
सुशांत यांना त्याच्या खिडकीच्या बाहेरील बाजूस सुमारे पाच इंचाचा असा मोठ्या आकाराचा पतंग आढळून आला. त्यांनी त्यास पकडून घरात उबदार कपड्यावर ठेवले आणि पिसावरे येथील पक्षी निरीक्षण मंडळाच्या शुभांगी बरदाडे व रविशा बरदाडे यांच्याशी संपर्क साधला. रविशा यांनी पक्षी निरीक्षक संतोष दळवी यांच्याशी चर्चा साधून या पतंगाची माहिती सांगितली. त्यानंतर सुशांत ने तो पतंग रानात सोडून दिला.
पंख बंद करून झाडाच्या खोडावर बसतो
ॲटलस पतंगांचे मुख्य भक्षक-पक्षी आणि सरडे दृश्य शिकारी आहेत. शिवाय, तो संबंधित प्रजातींमध्ये सापाच्या डोक्याचे समान परंतु कमी परिभाषित आवृत्ती आहेत. ज्यातून एक नमुना दिसून येतो जो नैसर्गिक निवडीद्वारे सुव्यवस्थित केला जाऊ शकतो. ॲटलस पंख बंद करून झाडाच्या खोडावर बसलेला असतो.
दृष्टिक्षेपात एटलस मॉथ
१. नकाशासारखे नक्षीकाम आणि बदामी-तपकिरी रंगाचे पंख आकर्षक
२. पंखांवर असलेल्या मोठ्या पांढऱ्या ठिपक्यांमुळे त्यांना ‘ॲटलस’ हे नाव
३. खुणांव्यतिरिक्त, पंखांमध्ये पारदर्शक भाग असतात जे डोळ्यांचे ठिपके म्हणून करतात काम
४. हे खोटे डोळे पतंगाच्या शरीराच्या अधिक असुरक्षित भागांवरून लक्ष विचलित करतात. (डोके किंवा शरीर)
५. पंखांच्या वरच्या कोपऱ्यावरील खुणांकरिता सर्वात अधिक प्रसिद्ध
६. जे कोब्रा सापाच्या डोक्यांसारखे साम्य दर्शवितात
पिसावरे येथील पक्षी निरीक्षण मंडळाचे प्रमुख संतोष दळवी यांनी ''अॅटलस मॉथ''ची सांगितलेली वैशिष्ट्ये
- कार्ल लिनीअस याने १७५८ मध्ये या ''अॅटलस मॉथ'' प्रजातीची नोंद केली.
- मॉथचा पंखांचा विस्तार (दोन पंखातील अंतर) जास्तीत जास्त २४ सेमी एवढा असतो.
- मादी ही नरापेक्षा मोठी असते. नराच्या मिशा रुंद असतात.
- अॅटलस मॉथ आयुष्य साधारण १ ते २ आठवडे असते.
- मादी शरीरातून एक प्रकारचा रासायनिक व सोडते. याचा वास नरास कित्येक किलोमीटर दूर येतो.
- नर आणि मादी यांचे मिलन झाल्यावर अंडी देवून मादी मरण पावते.
- अंड्यातून मातकट हिरवट रंगाचे सुरवंट बाहेर येतात. साधारण ४ सेंटीमीटकरपर्यंत सुरवंटाची वाढ होते.
- लिंबू, संत्रे, पेरू यासारख्या वनस्पतींची पाने किंवा सदाहरित वनस्पतीवर यांची वाढ होते.
- खूप खाल्यावर सुरवंट ७ ते ८ सेंटीमीटरचा कोष करून त्यात आराम करतो.
- चार आठवडे कोषाच्या अवस्थेत काढल्यावर कुरूप अशा सुरवंटाचे मॉथमध्ये रूपांतर होते.
05856