भोरमध्ये फुले-शाहू-आंबेडकर विचाराचा जागर

भोरमध्ये फुले-शाहू-आंबेडकर विचाराचा जागर

Published on

भोर, ता. १५ ः येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि समविचारी संस्था-संघटना यांच्या वतीने २५ जानेवारीला ११ व्या फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सुरु असलेल्या निवडणुकांमुळे या वर्षी हे साहित्य संमेलन एकच दिवस होणार आहे. शहरातील हॉटेल सोनाली गार्डनच्या सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत हे संमेलन होईल, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव व संयोजन समितीच्या अध्यक्षा हसीना शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी डॉ. सुरेश गोरेगावकर, मंडळाचे अध्यक्ष राहुल गायकवाड, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, नाना समगीर, ज्ञानोबा घोणे, वाल्मिक कांबळे, ॲड. किरण घोणे, सुजित चव्हाण, दीपक रणभिसे, एम. डी. रणखांबे, निलेश घोडेस्वार, शत्रुघ्न तायडे, जयराज कारंडे, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
रविवारी सकाळी १० वाजता शाहीर काळूराम कांबळे यांच्या पोवाड्याने संमेलनाची सुरुवात होणार आहे. डॉ. प्रदीप पाटील हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असून कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्राचार्य सुरेश खराते हे संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. इम्रान खान उपस्थित राहतील.
या संमेलनात पत्रकार अरुण खोरे यांच्या हस्ते माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड यांना दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके स्मृतिसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर, रायगडच्या महिला व बाल कल्याण अधिकारी सुहिता ओव्हाळ यांच्या हस्ते महिला शाहिर सीमा पाटील यांना राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले कार्यगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय, डॉ. रुपाली अवचरे, पुष्पा बनसोडे, सीमा तनपुरे, छाया जावळे, सीमा आठवले, सिमा मुकादम यांना ‘सावित्रीची लेक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुस्तक चर्चा, नाट्य प्रयोग, किर्तन असे कार्यक्रम
संमेलनात दुपारी डॉ. पी. टी. गायकवाड लिखित ‘हिप्पोक्रेट्सच्या नावानं चांगभलं’ या पुस्तकावर डॉ. संगिता घोडके यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तक चर्चा होणार असून डॉ. राजाभाऊ भैलुमे आणि डॉ. रघुनाथ केंगार यामध्ये भाग घेणार आहेत. दुसऱ्या सत्रात अभिनेते सचिन वळंजू हे कवी अजय कांडर लिखित दीर्घांकावर आधारित ‘युगानु युगे तूच’ हा प्रयोग सादर करणार आहेत. सायंकाळी साहित्यिक सुरेश साबळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. श्यामसुंदर सोन्नर महाराज हे सहकाऱ्यांसमवेत ‘किर्तनातून संविधानाकडे...’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यासाठी विकास जाधव, सचिन गायकवाड आणि सुजित कडाळे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com