

भोर, ता. २० : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत खडकी आणि रावडी या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी, तर अंगसुळे ग्रामपंचायतीमधील सदस्याच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. ५ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि ४ ग्रामपंचायतींमधील ४ सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार अरुण कदम यांनी दिली.
भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील ९ सरपंच आणि ३४ सदस्य, अशा एकूण ४३ जागांसाठी निवडणूक होणार होती. सरपंचपदासाठी १२, तर सदस्यांसाठी १० उमेदवारांनी अर्ज भरले. छाननीमध्ये एक अर्ज बाद झाला. ६ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे सोनवडी, शिरवलीतर्फे भोर, पऱ्हर ब्रुद्रूक, करंदी खुर्द व आपटी या ५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली, तर सांगवी बुद्रुक, वडतुंबी, पऱ्हर ब्रुद्रुक व कांबरे खे.बा. येथील प्रत्येकी एक, अशा एकूण ४ सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे आता खडकी व रावडी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आणि अंगसुळे येथील सदस्याच्या एका जागेसाठी मंगळवारी (ता. २८) मतदान होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.