बारामतीत वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्याचा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्याचा कार्यक्रम
बारामतीत वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्याचा कार्यक्रम

बारामतीत वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्याचा कार्यक्रम

sakal_logo
By

बारामती, ता. ११ : ‘‘रस्त्यावरुन जाणारी वाहने आणि बैलगाड्यांवर रिफ्लेक्टर्स लावणे गरजेचे आहे. थोडीशी काळजी घेतली तर अनेक अपघात टळून प्राण वाचू शकतील, त्या मुळे रिफ्लेक्टर्स ही काळाची गरज आहे.’’ असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
माजी नगरसेवक अमर धुमाळ यांनी त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या अवजड वाहनांना रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त रिफ्लेक्टर्स बसविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते रिफ्लेक्टर्स बसवून करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी अमर धुमाळ यांनी अजित पवार यांना या उपक्रमाची माहिती दिली. विविध कारखाना परिसरातील वाहनांना लवकरात लवकर रिफ्लेक्टर्स लावण्याचा कार्यक्रम पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी पवार यांना दिली.