Fri, Jan 27, 2023

बारामती येथे आज,
सोमवारी पाणी बंद
बारामती येथे आज, सोमवारी पाणी बंद
Published on : 13 January 2023, 2:52 am
बारामती, ता. १३ : शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात झालेला तांत्रिक बिघाड व साठवण तलावातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे शनिवारी (ता. १४) व सोमवारी (ता. १६) बारामतीकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी याबाबत माहिती दिली की, रविवारी (ता. १५) पाणीपुरवठा केला जाणार आहे. मंगळवारपासून (ता. १७) पिण्याचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी या बदलाची नोंद घेत आवश्यक पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.