वंशाच्या दिव्याचाच हट्ट कशाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंशाच्या दिव्याचाच हट्ट कशाला?
वंशाच्या दिव्याचाच हट्ट कशाला?

वंशाच्या दिव्याचाच हट्ट कशाला?

sakal_logo
By

बारामती, ता. १५ : "मुलांचा हट्ट धरु नका, पोरगाच पाहिजे, वंशाचा दिवाच हवा...हा हट्ट कशासाठी? मुलीही वडिलांचे नाव काढतात, सुप्रिया सुळे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, त्या मुळे महिलांनी आपल्या सुनांना दोन मुलांवर थांबण्याचा सल्ला द्यावा,'''' असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

येथील ऋतुराज काळे मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी एक हजार स्वेटर, पाचशे महिलांना साडी वाटप तर पंधरा महिलांना शिलाई मशिनचे वाटप अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. १५) करण्यात आले, त्या प्रसंगी पवार बोलत होते. नटराजचे अध्यक्ष किरण गुजर अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, संभाजी होळकर, सचिन सातव, जय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, बारामती शहराचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरु आहे. शहरातील काही रस्त्यांवर खड्डे पडलेले असून ते तातडीने बुजविण्यासाठी अधिका-यांना सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला लहान मुलांसाठी खेळणी बसविली जात असून काही ठिकाणी छान उद्याने विकसित केली जाणार आहे, कसब्यात एकाच ठिकाणी सात महापुरुषांचे अर्धपुतळे बसविले जाणार असून दशक्रिया विधी घाटाचेही नूतनीकरण केले जाणार आहे.
दरम्यान, किरण गुजर यांनी ऋतुराज काळे यांच्या कार्याचा आढावा भाषणात घेतला. ऋतुराज काळे यांनी स्वागत केले.

''नागरिकांनी झाडे तोड नयेत''
बारामतीसाठी अनेक नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र नागरिकांनीही झाडे तोडू नयेत, अस्वच्छता करू नये, अतिक्रमण करू नये या सारख्या बाबीची काळजी घ्यावी, असेही अजित पवार म्हणाले. रस्ते चांगले केल्यावर टपऱ्या टाकू नका, मला कोणालाही दुखवायचे नाही पण चुकीची कामे करू नका, असेही ते म्हणाले.

06596