Sun, Jan 29, 2023

बारामतीत आभाळमाया ग्रुपतर्फे ब्लॅंकेट वाटप
बारामतीत आभाळमाया ग्रुपतर्फे ब्लॅंकेट वाटप
Published on : 20 January 2023, 11:48 am
बारामती, ता. २० : येथील आभाळमाया ग्रुपतर्फे बारामतीमधील पदपथ, एसटी स्टँड, मंडई, स्टेशन परिसरात थंडीत कुडकुडणाऱ्या नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
संक्रांतीच्या निमित्ताने बारामतीतील आभाळमाया ग्रुपच्या प्रमुख अल्पा भंडारी यांच्यासह अर्चना भंडारी, अंजली देसाई, वैशाली मुथा, हेमा ओसवाल, शीतल गुंदेचा, सायली मोदी, योगिता मुथा, शिल्पा ओसवाल, शीतल मुथा, श्रद्धा दोशी, लता ओसवाल, मंजू बोराणा, कविता गांधी, सुरभी ओसवाल, आरती भंडारी, मयूरी मुरूमकर, कल्पना ओसवाल, मनीषा मुथा, सपना शहा, सुनीता मोदी यांनी हळदीकुंकू कार्यक्रमाचा खर्च टाळून हा विधायक उपक्रम राबविला.
------------------------