Thur, Feb 9, 2023

बारामतीत रक्तदान शिबिर
बारामतीत रक्तदान शिबिर
Published on : 21 January 2023, 1:12 am
बारामती, ता. २१ ः येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ बारामती शाखेच्या नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या ६७व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन आयुर्विमा महामंडळ शाखा बारामतीचे शाखाधिकारी हेमंत जोशी व उपशाखाधिकारी गणेश खंडागळे यांनी केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सचिव गणेश सोडमिसे, बारामती संघटनेचे सुनील जोगळेकर, प्रतीक शिंदे तसेच इतर सहकाऱ्यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.