
बारामतीत चोरीप्रकरणी महिलेला अटक
बारामती, ता. ४ : पार्लरसाठी घरात आलेल्या एका महिलेने घरातील डुप्लिकेट चावी वापरून दागिन्यांची चोरी केल्याची घटना बारामतीत पोलिसांनी उघड केली.
तेजस्विता स्वप्नील जरांडे (रा. देवळे पॅराडाईज, बारामती) या लेडीज पार्लर चालवितात. त्यांच्या घरातून त्या पाच दिवस गावाला गेलेल्या असताना कोणीतरी चावी वापरून गंठण, चेन, टॉप्स व रोकड चोरल्याचे लक्षात आले. शेजारील एका महिलेने ही चोरी केल्याचे पोलिसांनी उघड करत दागिने जप्त केले. हे दागिने तिने पुण्यात ठेवून त्याच्या बदल्यात रोख रक्कम आणली होती. पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
पोलिस निरिक्षक सुनील महाडीक, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, प्रकाश वाघमारे, पोलिस हवालदार कल्याण खांडेकर, पोलिस नाईक दशरथ कोळेकर, पोलिस हवालदार शिंदे, तुषार चव्हाण, दशरथ इंगवले अक्षय सिताप, शाहू राणे व लोकरे यांनी हा तपास केला.