
''महाराजस्व''द्वारे सेवांचा लाभ वेळेत पुरवा
बारामती, ता. ७ : ''''सर्व विभागांनी ''महाराजस्व'' अभियान यशस्वीपणे राबवून लाभार्थ्यांना विविध योजना व सेवांचा लाभ गतीने आणि वेळेत पुरवावा,'''' असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
बारामती येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व अन्य सर्व शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन केले होते. या प्रसंगी प्रांताधिकारी कांबळे बोलत होते.
तहसीलदार विजय पाटील, परिविक्षाधीन तहसीलदार नेहा शिंदे, निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार डॉ. भक्ती सरोदे-देवकाते, उपमुख्याधिकारी पदमश्री दाईंगडे, तालुका कृषिअधिकारी सुप्रिया बांदल, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका सस्ते, परिविक्षाधीन-नायब तहसीलदार तुषार गुजवटे उपस्थित होते.
तहसीलदार विजय पाटील म्हणाले की, प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी तालुका स्तरावर महाराजस्व अभियान राबविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. हे अभियान ३० एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे. शासकीय विभागाकडून दिले जाणारे परवाने, दाखले, प्रमाणपत्रे आदींसह गावातील रस्ते, वहिवाटीचे कामे, फेरफार नोंदी निर्गत करणे, अतिक्रमण काढणे, अकृषिक परवाना आदी प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांना मिळालेला लाभ:
महाराजस्व अभियानांतर्गत २६ जानेवारीपासून ५५८ शिधापत्रिका, ३९२ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना अनुदान पत्र, १० लाभार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ४१ हजारांचे अनुदान वाटप, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे १३८ नूतनीकरण परवाना, ८६८ शिकाऊ परवाना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०२२-२०२३ अंतर्गत २ ट्रॅक्टर, १ मेकॅनिकल रिव्हर्सिबल सिंगल पल्टी नांगर, १ रोटाव्हेटर, पंचायत समिती कडून ९३-३ एचपी पाणबुडी मोटार, ७६-५ एचपी पाणबुडी मोटार, ३६ सरी रिझट, ८१ ताडपत्री, २२ क्रेटस, ६० बॅटरी पंप, बारामती नगरपरिषद मार्फत ३६८ लाभार्थ्यांना पंतप्रधान स्वनिधी प्रमाणपत्र व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून १५५ मोजणीचे नकाशांचे वाटप केले आहे.
06722