Sat, April 1, 2023

महात्मा गांधी शाळेच्या शिक्षिकांचे यश
महात्मा गांधी शाळेच्या शिक्षिकांचे यश
Published on : 13 February 2023, 11:04 am
बारामती, ता. १३ : येथील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेच्या शिक्षिकांनी पुणे येथील शारदा बालक विहार यांनी आयोजित केलेल्या विविधांगी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये ऑनलाइन बालगीत गायन स्पर्धेमध्ये नीता तावरे यांचा स्वरचित बालअभिनय गीत गायन सादरीकरणास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. बालकथा लेखन स्पर्धेमध्ये आशा बारटक्के यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. प्रसिद्ध बासरी वादक मिलिंद दाते यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान केले.