Thur, March 30, 2023

जळोची येथील शिबिरात ३५० रुग्णांची तपासणी
जळोची येथील शिबिरात ३५० रुग्णांची तपासणी
Published on : 18 February 2023, 11:07 am
बारामती, ता. १८ : जळोची (ता. बारामती) येथे महाशिवरात्रीनिमित्त महाकाळेश्वर मंदिरात ३५० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध वाटप केले. डॉ. सदानंद काळे, डॉ. महेंद्र आटपलकर व डॉ. राहुल आगवणे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबीराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कांबळे, नंदू वाईकर, माजी नगरसेवक शैलेश बगाडे, महेंद्र गोरे, जब्बार शेख यांनी केले. यावेळी प्रताप पागळे, ॲड.अमोल सातकर, माधव मलगुंडे, नवनाथ मलगुंडे, दत्तात्रेय माने, धनंजय जमदाडे, प्रमोद ढवाण, अमोल पिसाळ, दत्तात्रेय गोसावी, दादा शिरसट तसेच जळोची भैरवनाथ यात्रा कमिटीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.