बारामतीत दहा केंद्रांवर ७, ८०५ विद्यार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत दहा केंद्रांवर ७, ८०५ विद्यार्थी
बारामतीत दहा केंद्रांवर ७, ८०५ विद्यार्थी

बारामतीत दहा केंद्रांवर ७, ८०५ विद्यार्थी

sakal_logo
By

बारामती, ता. २१ ः माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परिक्षा आजपासून बारामतीतील १० केंद्रावर सुरु झाली.
बारामतीतील दहा केंद्रावर आज ७८०५ विद्यार्थी या परिक्षेसाठी नशीब आजमावत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे व विस्ताराधिकारी संजय जाधव यांनी दिली. टीसी महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शारदाबाई पवार महाविद्यालय, एम. एस. काकडे कनिष्ठ महाविद्यालय, श्री छत्रपती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, श्री शहाजी कनिष्ठ महाविद्यालय, सुपे, श्री सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, कोऱ्हाळे बुद्रुक, अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल, कटफळ, श्री विठ्ठल कनिष्ठ महाविद्यालय भिकोबानगर येथे परिक्षा केंद्र आहेत.
दरम्यान, कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी चार भरारी पथकांसह यंदा प्रथमच दहाही केंद्रांवर बैठे पथक नियुक्त केले गेले. बैठे पथकामध्ये एक केंद्रप्रमुख व दोन शिक्षकांचा समावेश होता. कोणताही कॉपी किंवा अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी या पथकाने घेतली.