आध्यात्मिक विश्व विद्यालयातर्फे बारामती परिसरात विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आध्यात्मिक विश्व विद्यालयातर्फे 
बारामती परिसरात विविध कार्यक्रम
आध्यात्मिक विश्व विद्यालयातर्फे बारामती परिसरात विविध कार्यक्रम

आध्यात्मिक विश्व विद्यालयातर्फे बारामती परिसरात विविध कार्यक्रम

sakal_logo
By

बारामती, ता. २२ : आध्यात्मिक विश्व विद्यालयातर्फे बारामतीत विविध ठिकाणी आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. गोदावरी नगर आणि सिद्धेश्वर गल्ली, ब्राह्मण सभागृहासह तांदूळवाडी येथील ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये हे कार्यक्रम झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून पी. बी. के. अमोल उपस्थित होते. त्यांनी भाविकांना कार्यक्रमादरम्यान ‘महाशिवरात्री चे आध्यात्मिक रहस्य’ आणि ‘शिव-शंकराची महिमा’ या विषयांवर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये ‘आध्यात्मिकता काय आहे आणि भारताचा अतिप्राचीन धर्म सनातन धर्माचा धर्मपिता कोण आहे’ या विषयावर अमोल यांनी मार्गदर्शन केले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये ‘योगाची खरी परिभाषा काय आहे’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.