आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करावा : डॉ. महाजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करावा : डॉ. महाजन
आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करावा : डॉ. महाजन

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करावा : डॉ. महाजन

sakal_logo
By

बारामती, ता. २६ : आयुर्वेद व योग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद व योग जगता आले पाहिजे, तरच यशस्वी आयुर्वेद चिकित्सक होऊ शकतील असे मत बारामतीतील आयुर्वेद तज्ञ डॉ. नीलेश महाजन यांनी व्यक्त केले. योग महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुलांकडून मेंदूला प्रशिक्षित करण्याच्या काही क्रिया करवून घेतल्या, तसेच प्राणयोगा संकल्पनेबद्दलचा एक माहितीपट दाखविला.

आयुर्वेद तसेच योगशास्त्रातील अनेक सिद्धांत एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे यशस्वी चिकित्सक होण्यासाठी त्यांची सांगड घालणे आणि स्वतः त्याचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. बारामतीत नव्याने सुरू झालेल्या शासकीय विद्यार्थ्यांसाठी संक्रमनकालीन अभ्यासक्रमाची सुरवात झाली. त्यासाठी वेगवेगळ्या विषयावरील तज्ञ डॉक्टरांचे, यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन केले जाते.

यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, डॉ. श्रीनिवास बोबडे, डॉ. साळी सर, डॉ. विवेक आंबरे, डॉ. समाधान पाटील आदी उपस्थित होते.