फळबाग लागवड योजनेसाठी करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फळबाग लागवड योजनेसाठी करा अर्ज
फळबाग लागवड योजनेसाठी करा अर्ज

फळबाग लागवड योजनेसाठी करा अर्ज

sakal_logo
By

बारामती, ता. २७ : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना २०२२-२०२३ अंतर्गत सलग क्षेत्रावर फळबाग व बांधावर फळझाडे लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित गावातील कृषी सहायकाकडे अर्ज करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
बारामती उपविभागास फळबाग लागवड योजनेसाठी ९०१ हेक्टर फळपिके लागवडीचे लक्षांक दिले होते. प्रत्यक्ष ९३८ हेक्टर क्षेत्रावर फळपीकाची लागवड झाली असून १०० टक्के लक्षांक पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२३ अखेर १५१५ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, का.लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभूळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ्रुट, ॲव्हाकॅडो, केळी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. गुलाब, मोगरा व निशिगंध या फुलपिकांच्या लागवडीसाठी देखील परवानगी देण्यात आलेली आहे.

अकुशल कामगारांना २५६ रुपये प्रति दिन प्रमाणे मजुरीवर आहे. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान व फळपीक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारशीनुसारच मर्यादित राहील. अतिरिक्त कलमे/रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही.

लागवड वर्षासह सलग तीन वर्षात मंजूर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती फळपिकांकरीता किमान ९० टक्के फळझाडे व कोरडवाहू फळपिकांकरिता किमान ७५ टक्के फळझाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील.

असेआहेत लाभार्थ्यांसाठी निकष
१. ०.०५ हेक्टर व जास्तीत जास्त दोन हेक्टरची मर्यादा
२. लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक
३. सातबारावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती
४. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, अल्प व अत्यल्प भूधारक,
५. दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, महिला व दिव्यांग आदींना प्राधान्य
५. लाभार्थी ग्रामपंचायतीचा जॉबकार्ड धारक असावा