बारामतीच्या अनेकान्त स्कूलमध्ये विविध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीच्या अनेकान्त स्कूलमध्ये विविध स्पर्धा
बारामतीच्या अनेकान्त स्कूलमध्ये विविध स्पर्धा

बारामतीच्या अनेकान्त स्कूलमध्ये विविध स्पर्धा

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : येथील अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिवस साजरा झाला. कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून स्कूलमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये बडबड गीत गायन, श्रुतलेखन, कथालेखन व पत्रलेखन या स्पर्धांचा समावेश होता. स्कूलच्या प्राचार्या राखी माथूर यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर भाषण, गीत गायन, नृत्य व प्रश्नमंजूषा कार्यक्रम सादर झाले.
मराठी भाषेबद्दलची आपुलकी व जिव्हाळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यक्त केला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना स्कूलच्या प्राचार्या राखी माथूर यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविले.