Sat, March 25, 2023

समीक्षा दाभाडे हिच्या प्रकल्पाला यश
समीक्षा दाभाडे हिच्या प्रकल्पाला यश
Published on : 3 March 2023, 11:09 am
बारामती, ता. ३ : येथे कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
या प्रदर्शनात विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळेतील समीक्षा विष्णू दाभाडे हिने सादर केलेल्या स्मार्ट व्हिलेज या प्रकल्पास द्वितीय क्रमांक मिळाला आहे. स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा शिंदे यांनी समीक्षाचे अभिनंदन केले.