Thur, March 30, 2023

बारामती शहरात आज
उद्योग भवनाचे उद्घाटन
बारामती शहरात आज उद्योग भवनाचे उद्घाटन
Published on : 17 March 2023, 10:28 am
बारामती, ता. १७ : येथील बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीतील पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार उद्योग भवन या इमारतीचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. १८) सकाळी नऊ वाजता होणार आहे, अशी माहिती वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार व उपाध्यक्ष मनोज पोतेकर यांनी दिली.
बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीने भिगवण रस्त्यावरील त्यांच्या जागेमध्ये उद्योग भवन उभारले आहे. या उद्योगभवनास डॉ. अप्पासाहेब पवार यांचे नाव दिले आहे. या उद्योगभवनमधील केएफसीच्या आउटलेटचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते या प्रसंगी होणार आहे.