Sun, Sept 24, 2023

सचिन साखरे यांना पीएचडी
सचिन साखरे यांना पीएचडी
Published on : 31 May 2023, 9:28 am
बारामती, ता ३१ : मूळ बारामतीकर असलेल्या सचिन साखरे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. ''भौगोलिक साक्षरताविषयक कार्यक्रम निर्मिती व त्याचा परिणामकारकतेचे अभ्यास हा पीएच. डी. विषय असून डॉ. शरद विश्वासराव यांनी त्यांना संशोधनाकरिता मार्गदर्शन केलेले आहे.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांनी भूगोल विषयात यश प्राप्तकेले होते, पुणे विद्यापीठातून त्यांनी उच्च पदवी प्राप्त केली. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चासत्रात सहभागी होत शोधनिबंध सादर केले आहेत.
07460