Fri, Sept 22, 2023

बारामती पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. विजय भिसे
बारामती पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. विजय भिसे
Published on : 3 June 2023, 11:55 am
बारामती, ता. ३ : बारामती येथील पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. विजय भिसे यांची नुकतीच निवड करण्यात आली. पत्रकार संघाची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी २०२३ ते २०२६ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष- डॉ. विजयकुमार भिसे, उपाध्यक्ष-नवनाथ बोरकर, शिवाजीराव ताटे, कार्याध्यक्ष- शुभांगी महाडीक, सचिव-तैनुर शेख, सहसचिव- स्वप्नील शिंदे, खजिनदार-सोमनाथ कवडे, सहखजिनदार-दीपक पडकर यांची सवार्नुमते निवड झाली.
याप्रसंगी अमोल तोरणे, स्वप्नील शिंदे, सोमनाथ कवडे, वसंत मोरे, सुधीर जन्नू यांनी मनोगत व्यक्त केले. मावळते अध्यक्ष सुधीर जन्नू यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. भिसे यांचे स्वागत केले. दत्तात्रेय महाडीक यांनी आभार मानले.