राऊत यांना सरकारसाठी
शुभेच्छा : अजित पवार

राऊत यांना सरकारसाठी शुभेच्छा : अजित पवार

Published on

बारामती, ता. १८ : ‘‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना संजय राऊत हेच म्हणायचे की, ‘आमची आघाडी पंचवीस वर्षे टिकणार आहे,’ आता जर त्यांना स्वतःच सरकार यावं असं वाटत असेल; तर त्यात मला काही चुकीच वाटत नाही. त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखविली आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,’’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत केल्यानंतर माध्यमांशी अजित पवार बोलत होते. संजय राऊत यांनी स्वबळाची भाषा केली, याबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. भाजपविरुद्ध लढण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत, याचीही आठवण त्यांनी करून दिली. तसेच ते म्हणाले, ‘‘संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले तर कधीच कोणालाच काही कमी पडणार नाही. स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, आशीर्वाद राज्यातील जनतेला मिळावेत, सर्वांना सुख-शांती नांदावी, चांगला पाऊस पडावा हीच इच्छा व्यक्त केली.’’

बावनकुळे यांना टोला
‘‘चंद्रशेखर बावनकुळे जर मनकवडे असतील व त्यांना दुसऱ्याच्या मनात काय चाललं, हे समजत असेल तर मग न बोललेले बरे,’’ या शब्दात अजित पवार यांनी खिल्ली उडवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.