घरफोडीप्रकरणात सहा जण अटकेत

घरफोडीप्रकरणात सहा जण अटकेत

बारामती, ता. २० : शहरातील सातव चौकातील सदनिका फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज चोरणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. शहर व तालुका पोलिसांच्या हद्दीतील वीसहून अधिक घरफोडी घटनात पोलिसांनी सहा जणांना आतापर्यंत अटक केली आहे.
बारामतीतील सातव चौकातील रम्यनगरीमधील चरणसिंग किसन चव्हाण यांची सदनिका १४ ऑगस्ट रोजी ते बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने व रोकड, असा जवळपास सात लाखांचा ऐवज चोरुन नेला होता.
या घरफोडीनंतर बारामती शहर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक दिनेश तायडे, सहायक पोलिस निरिक्षक गंधारे, अमित पाटील, युवराज घोडके व इतर पोलिस कर्मचारी यांनी तांत्रिक विश्लेषण व इतर माध्यमातून तपास केला.
या तपासानंतर हेमंत उर्फ बारक्या बड्या पवार, कुत्या रमेश पवार (दोघेही. रा. जामदाररोड, बारामती), सुमित आदित्य पवार (रा. माळेगाव, बारामती) व विजय देख्या भोसले (रा. जामदाररोड, शिवाजीनगर) यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस निरिक्षक दिनेश तायडे यांनी दिली.

बारामती शहर व तालुका पोलिसांच्या हद्दीत घरफोडीचे सत्र सुरु असून तालुका पोलिसांनी दोन चोरट्यांना पाठलाग करुन अटक केली व शहर पोलिसांनीही चार चोरट्यांना अटक केली आहे. या घरफोडीप्रकरणी सहा जण अटकेत असून, पोलिस त्यांच्याकडे कसून तपास करीत आहेत. विविध माध्यमातून पोलिसांचा तपास सुरु असून सर्व घरफोड्या उघडकीस येतील.
- आनंद भोईटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com