सुप्रिया सुळे यांच्यासाठी 
बारामतीत प्रचार फेरी

सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीत प्रचार फेरी

बारामती, ता. ३० : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. ३०) बारामती शहरात प्रचार फेरीचे आयोजन केले होते.
विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पक्षाच्या महिला अध्यक्ष वनिता बनकर, शहराध्यक्ष संदीप गुजर, युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, प्रियांका शेंडकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते.
या प्रचारफेरीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन सर्वच मान्यवरांनी केले. गेल्या तीन टर्ममध्ये सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामाची माहिती देणारी पत्रके यावेळी वाटण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com