मारहाण करीत चोरट्यांनी प्रेमी युगुलाास लुटले

मारहाण करीत चोरट्यांनी प्रेमी युगुलाास लुटले

बारामती, ता. १२ : प्रेमी युगुलास अडवून त्यांना मारहाण करत मुलीच्या शुक्रवारी (ता. १०) अंगावरील ९० हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. या युगुलाचे कपडे उतरवित आक्षेपार्ह अवस्थेत त्यांचे फोटो चोरट्यांनी काढले. ही धक्कादायक घटना बारामती विमानतळानजिक घडली. अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या असून, त्या पैकी एकाने पोलिसात फिर्यादच नोंदविलेली नसल्याचेही पुढे आले आहे.
वाढत्या चोऱ्यांमुळे बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना आता प्रेमी युगुलांचे कपडे उतरवून त्याचे फोटो काढण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने बारामतीकर कमालीचे असुरक्षित बनल्याची नागरिकांची भावना आहे. पोलिसांची निष्क्रियता ठळकपणे समोर आली आहे. दरम्यान, एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
एक युवती आपल्या मित्रासह मोटारीतून विमानतळानजीक फिरायला गेली असताना दोन अज्ञात चोरटे मास्क लावून आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवीत युवतीच्या गळ्यातील चेन व कर्णफुले काढून घेतले. युवकाला त्यांनी दगडाने मारहाणही केली. त्या नंतर त्यांना जबरदस्तीने निर्वस्त्र करून त्यांचे फोटो काढले.
संबंधित युवतीने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशीच एक घटना मुंबईतील एका व्यक्तीसोबत घडल्याचेही समोर आले असून पोलिसांनी त्यांनाही बोलावून घेत चौकशी सुरु केली आहे. बारामतीत पोलिसांचे अस्तित्व आहे की, नाही अशीच स्थिती गेल्या काही महिन्यात घडली असून वरिष्ठ अधिकारी याबाबत मौन बाळगून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com