मुसळधार पावसाची बारामतीत हजेरी

मुसळधार पावसाची बारामतीत हजेरी

बारामती, ता. १४ : शहर व परिसरात मंगळवारी (ता. १४) दुपारी वळीवाचा मुसळधार पाऊस झाला. दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. पावसासह काही भागात गाराही पडल्या.

बारामतीत काल (ता. १३) रात्रीही दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाने त्रस्त झालेल्या बारामतीकरांना पावसाने थंडावा मिळाला. दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. पावसाचा जोर इतका होता की काही वेळातच रस्त्यांवरून पाणी वाहू लागले.

एप्रिल महिन्यापासूनच बारामतीत उन्हाचा तडाखा जाणवत होता. यंदाही बारामतीचे तापमान ४० अंशाहून अधिक होते. लोकसभा निवडणुकीदरम्यानही उन्हाचा मोठा तडाखा जाणवला. गेल्या तीन दिवसांपासून बारामती शहर व पंचक्रोशीमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारनंतर झालेल्या पावसाने रस्त्यांवर तळी साचली होती. शहरातील रिंग रोड परिसरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचून राहिले होते. संध्याकाळी घरी परतणाऱ्यांचे पावसामुळे तारांबळ उडाली. शहरातील काही परिसरात गारा पडल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com