बारामती येथे येत्या रविवारी नववी ते बारावीसाठी सेमिनार

बारामती येथे येत्या रविवारी नववी ते बारावीसाठी सेमिनार

बारामती, ता. २३ : करिअरच्या अनेक संधीची शाश्वती देणाऱ्या मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रातील अभ्यासाची तयारी, विविध स्पर्धा परीक्षांची ओळख आणि अन्य बाबींची माहिती करून घेण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ व दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नितीन कदम यांचा मार्गदर्शनपर मोफत सेमिनार बारामतीत होणार आहे.
इयत्ता नववी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सेमिनार उपयुक्त असेल. दहावीनंतरच्या करिअरच्या संधी, स्पर्धा परिक्षा, परिक्षा उत्तम गुणांनी कशी उत्तीर्ण व्हायची याचे तंत्र अशा अनेक महत्त्वाच्या मुदयांवर डॉ. नितीन कदम या सेमिनारमध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत.
नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी व पालक यांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिशा ॲकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे. करिअरची निवड करताना परिपूर्ण मार्गदर्शन गरजेचे असते. या सेमिनारच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना परीक्षेला कसे सामोरे जायचे, उत्तम गुण कसे मिळवायचे व भविष्यातील करिअरच्या संधी अशा तिहेरी मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.

• स्थळ - हॉटेल अमरदीप, भिगवण रोड, बारामती
• ता. : २६ मे २०२४
• वेळ दुपारी चार वाजता.
• संपर्क : ८९५६७४८२१३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com