दहावी- बारावीनंतरच्या   
परिपूर्ण मार्गदर्शनाची संधी

दहावी- बारावीनंतरच्या परिपूर्ण मार्गदर्शनाची संधी

बारामती, ता. १ : करिअर घडविताना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत अचूक आणि परिपूर्ण माहिती देण्याच्या उद्देशाने येत्या शुक्रवारपासून (ता. ७) सकाळ माध्यम समूहाच्या वतीने बारामतीत सकाळ विद्या एज्युकेशन एक्सपो २०२४ चे आयोजन केले आहे. त्यासाठी मुख्य प्रायोजक ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व पॉवर्ड बाय १७२९ आचार्य ॲकॅडमी प्रा. लि., सहप्रायोजक पेस ॲकॅडमी बारामती, सहयोगी प्रायोजक दत्तकला शिक्षण संस्था भिगवण आहेत.
बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सिटी इन चौकातील मुक्ताई लॉन्स येथे या एक्स्पोचे आयोजन केले आहे. त्यात बारामती पंचक्रोशीतील नामांकित शिक्षण संस्था सहभागी होणार आहेत. तीन दिवसांच्या या एक्स्पोदरम्यान विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती दिली जाणार असून, मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. त्यात कनिष्ठ महाविद्यालयांपासून ते कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेस, केजी टू पीजी अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी व पालकांना एकाच छताखाली मिळू शकणार आहे.
महाविद्यालयीन प्रवेश, दहावी- बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध पर्यायाची, तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्र शिक्षण, कृषी, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, माहिती तंत्रज्ञान यासह अनेक अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली विद्यार्थी व पालकांना या एक्सपोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. एकाच दालनात शिक्षणाच्या विविध संधीचे पर्याय तसेच करिअरविषयक मार्गदर्शन तीन दिवसांच्या या एक्स्पोमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी मोफत उपलब्ध असेल.

काय, केव्हा, कधी, कुठे
• काय- सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४
• कधी- शुक्रवार ता. ७ ते रविवार ९ जून २०२४
• केव्हा- सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत
• कुठे- मुक्ताई लॉन्स, सिटीईन चौक, सूर्यनगरी, बारामती.

स्टॉल नोंदणीसाठी संपर्क- दत्तात्रेय- ८९७५ ६७३३ १०, रमेश- ८२०८ ५३९९ ४२.

BMT24B10226

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com