Loksabha Election Result
Loksabha Election Resultsakal

Loksabha Election Result : महाविकास आघाडीत संचारले चैतन्य

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या दीड लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या. एकीकडे आमदार, नेते, पदाधिकारी, यंत्रणा यांची ताकद असताना व दुसरीकडे अगदी बूथवरही पुरेसे कार्यकर्ते नसतानाही त्यांनी घेतलेले मताधिक्य बरेच काही सांगून जाणारे आहे.

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या दीड लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या. एकीकडे आमदार, नेते, पदाधिकारी, यंत्रणा यांची ताकद असताना व दुसरीकडे अगदी बूथवरही पुरेसे कार्यकर्ते नसतानाही त्यांनी घेतलेले मताधिक्य बरेच काही सांगून जाणारे आहे. अनेक पदाधिकाऱ्याबांबतच्या नाराजीचा फटका सुनेत्रा पवार यांना बसला. त्यामुळे पक्षसंघटनेसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होतील, अशी चिन्हे आहेत. भाकरी फिरवली नाही; तर विधानसभेतही फटका बसण्याची भीती व्यक्त होते आहे. तर, महाविकास आघाडीत या निकालाने चैतन्य संचारले आहे. भोर, पुरंदरचे आमदार निश्‍चित झाले आहेत. तर, दौंड, इंदापूर, बारामती, खडकवासलाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व इतर घटक पक्ष एकत्रित निवडणूका लढले खरे, पण विधानसभेला काय करायचा? हा यक्ष प्रश्न सर्वच नेतेमंडळींपुढे आहे. इंदापूरचेच उदाहरण घेतले तर हर्षवर्धन पाटील की दत्तात्रेय भरणे, दौंडमध्ये राहुल कुल की रमेश थोरात, अशी स्थिती कमी अधिक प्रमाणात निर्माण होणार आहे. पुरंदर, भोरमध्ये नक्की कोण लढणार, यावर महायुतीतील नेते कसा तोडगा काढणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दिलेले शब्द कसे पाळणार, याची उत्सुकता आहे. कॉंग्रेसकडून भोरमध्ये संग्राम थोपटे व पुरंदरमधून संजय जगताप या आमदारांना पुन्हा संधी मिळणार, हे जवळपास निश्‍चित आहे. त्यांचा मार्गही सुकर झाला आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून दौंडमध्ये व इंदापूरमध्ये कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे.

अजित पवारांविरोधात कोण?
पवार कुटुंबातील ही फूट लोकसभा निवडणुकीनंतरही कायम राहणार, की पुन्हा नव्याने काही राजकीय समीकरणे उदयास येणार, याची आता उत्सुकता आहे. येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्यात निश्चित काही फेरबदल या निकालाने होतील, यात शंका नाही. लोकसभेचा निकाल अजित पवार यांच्या विरोधात गेला असला, तरी विधानसभेला बारामतीत असे चित्र नाही. बारामतीत अजित पवारांना सध्यातरी तुल्यबळ उमेदवार विरोधकांकडे दिसत नाही. पवार कुटुंबीयांतून अजित पवार यांच्या विरोधात कोणाला उभे केले जाते, हा औत्सुक्याचा विषय असेल. युगेंद्र पवार यांचे नाव सध्या चर्चेत आहे.

३६ जणांचे डिपॉझिट जप्त
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार वगळता इतर सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्य
सुप्रिया सुळे यांना पडलेली मते- ७,३२,३१२
सुनेत्रा पवार- ५,७३,९७९
सुप्रिया सुळे यांना मताधिक्य- १,५८,३३३

दौंड – सुप्रिया सुळे- ९२०६४ सुनेत्रा पवार- ६५७२७- सुप्रिया सुळे यांना मताधिक्य २६३३७
इंदापूर – सुप्रिया सुळे- ११४०२० सुनेत्रा पवार- ८८०६९- सुप्रिया सुळे यांना मताधिक्य २५९५१
बारामती – सुप्रिया सुळे- १४३९४१ सुनेत्रा पवार- ९६५६०- सुप्रिया सुळे यांना मताधिक्य ४७३८१
पुरंदर – सुप्रिया सुळे- १२५९४८ सुनेत्रा पवार- ९०६६७- सुप्रिया सुळे यांना मताधिक्य ३५२८१
भोर – सुप्रिया सुळे- १३४२४५ सुनेत्रा पवार- ९०४४०- सुप्रिया सुळे यांना मताधिक्य ४३८०५
खडकवासला- सुप्रिया सुळे- १२११८२ सुनेत्रा पवार- १४१९२८ सुनेत्रा पवार यांना मताधिक्य २६३३७)
पोस्टल मते- सुप्रिया सुळे- ९१२- सुनेत्रा पवार- ५८८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com