उपमुख्यमंत्री पवारांनी साधला वारकरी, वीणेकऱ्यांशी संवाद

उपमुख्यमंत्री पवारांनी साधला वारकरी, वीणेकऱ्यांशी संवाद

Published on

बारामती, ता. ७ : उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार रविवारी (ता. ७) सकाळीच श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी चालत सहभागी झाले. मुंबईहून बारामतीला विमानाने आलेले अजित पवार हे थेट विमानतळावरून मोतीबाग येथे पालखी सोहळ्यात सहभागी झाले. तेथून ते काटेवाडीच्या दिशेने चालत निघाले. सुनेत्रा पवार याही त्यांच्या समवेत काही काळ सहभागी झाल्या.
पायी चालताना अनेक वारकरी, वीणेकरी, पालखी सोहळ्याचे प्रमुख यांनी अजित पवार यांच्याशी संवाद साधला. राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी अजित पवार यांच्यासमवेत फोटोसेशनही केले. अजित पवार यांनी टोपी परिधान करून काही काळ टाळ वाजवून वारकऱ्यांना साथ संगत केली.
उपमुख्यमंत्री पालखीत चालणार असल्याने आज कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. अनेक बारामतीकरही सकाळपासूनच बारामती ते सणसर हे अंतर चालत जातात, सकाळच्या पूजेनंतर पालखी सोहळा काटेवाडीकडे मार्गस्थ झाला, तेव्हा भाविकांनी जड अंतःकरणाने सोहळ्यास निरोप दिला.
दरम्यान, सकाळी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सपत्निक पूजा केली.

दुचाकीवरून अजित पवार आले घरी
काटेवाडीतील पालखी विसावा स्थळापासून अजित पवार यांच्या घरी जाण्यासाठी चार चाकी गाडीला जागा मिळणे अवघड असल्याने अजित पवार यांनी मिलिंद काटे यांच्या दुचाकीवर बसून आपले घर गाठले.

10504

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.