बारामतीत येत्या रविवारी 
महायुतीची जन सन्मान रॅली

बारामतीत येत्या रविवारी महायुतीची जन सन्मान रॅली

Published on

बारामती, ता. ८ : महायुतीच्या वतीने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातील भरीव तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्यावतीने बारामतीत येत्या रविवारी (ता. १४) जन सन्मान रॅलीचे आयोजन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून ही रॅली बारामतीत आयोजित करण्यात येत असून, या निमित्ताने बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुती आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (ता. ८) मुंबईत झाली. त्यात, येत्या १४ जुलै रोजी बारामतीत जाहीर ‘जन सन्मान’ रॅली आयोजित करण्याचा ठराव झाला.. बारामतीची होणारी ही ऐतिहासिक रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचा संदेश देणारी असेल. तसेच, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील योजनांचा लाभ आणि बळ जनतेला मिळवून देण्यासाठी पक्ष म्हणून कराव्या लागणाऱ्या कामांची देखील रूपरेषा या जाहीर सभेत सादर केली जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या रॅलीसाठी निमंत्रित करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असून, त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची अजित पवार यांनी रविवारी विमानतळावर एक बैठक देखील घेतली. त्यानुसार बारामतीत कार्यकर्त्यांनी आता या रॅलीचे आयोजनासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. माहितीतील सर्वच घटक पक्षांना या यादीमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.