बारामतीत अजित पवार 
मोठा धमाका करणार

बारामतीत अजित पवार मोठा धमाका करणार

Published on

बारामती, ता. १० : येथे येत्या रविवारी (ता. १४) होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसन्मान मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा धमाका करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
या मेळाव्याच्या निमित्ताने गारटकर यांनी पुणे व बारामतीत जिल्ह्यातील पक्षातील सर्वच प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. रविवारी दुपारी एक मिशन हायस्कूल ग्राउंड टीसी कॉलेज समोर येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, सर्व आमदार, खासदार, पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत कोणताच धोका पत्करायचा नाही, सरकारने घेतलेले सर्व लोकोपयोगी निर्णय मतदारांपर्यंत पोहोचविण्यात कोठेही कमी पडायचे नाही, सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करायचा, असा अजेंडा ठरवूनच आता राष्ट्रवादीची व्यूहरचना ठरली आहे. राज्यातील प्रमुख शहरात अशा पद्धतीने मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. सर्व प्रमुख नेते, आमदार व पदाधिकारी यांची एकीही या निमित्ताने महाराष्ट्रासमोर येईल, असा पक्षाचा प्रयत्न आहे.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, महिला तालुकाध्यक्षा ज्योती लडकत, शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.